तंत्रज्ञानाची साथ अन मेहनतीच्या जोरावर तरुण शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यात कमावले दहा लाखांचे उत्पादन!

Published on -

अहिल्यानगर: सध्या शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही, मजुरी खूप वाढली आहे, मालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेती परडवत नाही. यामुळे बहुतेकजण शेती करणे नको रे बाबा असे म्हणत शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. एकीकडे शेतीपासून शेतकरी दूर पळताना दिसत असताना दुसरीकडे मात्र दुष्काळी असलेल्या जामखेड तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्याने शेतीत नवीन प्रयोग करत अवघ्या दहा गुंठ्यात तब्बल दहा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

जामखेड तालुका म्हटले की दुष्काळ येथील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला, त्यामुळे या भागात ज्वारी हेच मुख्य पीक घेतले जाते. परिणामी या भागातील अनेक तरुण कामानिमित्त बाहेर पडले. पर्यायाने येथील परिस्थिती आहे तशीच राहीली. परंतु तालुक्यातील फक्राबाद येथील प्रगतशील शेतकरी युवा शेतकरी अजय सातव व त्यांचे भाऊ विजय सातव या बंधूंनी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस उभारून यामध्ये लाल व पिवळी सिमला मिरचीचे पीक घेतले .

माध्यमातून वार्षिक ७ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. दहा गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस तसेच २एकर क्षेत्रावर तैवान पिंक जातीच्या पेरूची बाग व ३एकर क्षेत्रावर साई सरबती या वाणाची लिंबोनीची बाग लावली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीचे उत्पादन घेऊन प्रगतशील शेतकरी आणि बी एस सी अॅग्री शिक्षण घेऊन नोकरी न करता फक्राबाद येथील आपल्या शेतातील कमी पाण्यामध्ये ठिबक सिंचन करुन फळबागांच्या माध्यमातून शेतीतून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळून युवा पिढी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe