अबब ! गवार १३६ रुपये, भेंडी, मिरची ५० रुपये किलो; तर टरबूज, मेथी पालक फक्त ४ रुपयांना

Published on -

मार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे. काही भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. तर काही भाजीपाल्याचे , फळांचे दर फार कमी झाले आहेत. यात गवार सध्या १३६ रुपये किलोपर्यंत गेली आहे. भेंडी, हिरवी मरीची ५० रुपयांपर्यंत गेली आहे. टरबूज, खरबूज, मेथी, पालक मात्र अत्यंत उतरले असून भाव ४ ते पाच रुपयांपर्यंत आले आहेत.

एकदा सर्व दरांवर नजर टाकुयात.. बाजारात गवारला १३६०० रुपये भाव मिळाला. हिरवी मिरचीला ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला. भेंडीला ४५०० रुपये, शेवगा १५०० रुपये, घेवडा ३००० रुपये, असा प्रतीक्विंटलला भाव मिळाला. वाटाणा १२०० ते ५००० रुपये तर सरासरी ३१०० रुपये भाव मिळाला. द्राक्षे ३००० ते ३२०० रुपये तर सरासरी ३१०० रुपये. पपई सरासरी १००० रुपये. टरबूज ४०० ते ७०० रुपये तर सरासरी ५०० रुपये.

खरबुज १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये. आद्रक २५०० ते ४००० रुपये तर सरासरी ३००० रुपये. बटाट्याची ३३ क्विंटल ची आवक झाली. बटाटा ५०० ते १६०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये क्विंटल. बीट ५०० रुपये ते १००० तर सरासरी ७०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. भेंडी २५०० ते ४५०० रुपये तर सरासरी ३५०० रुपये. दुधी भोपळा ५०० ते १००० रुपये तर सरासरी ७५० रुपये.

चवळी शेंगा १५०० ते २००० रुपये तर सरासरी १७०० रुपये. ढेमसे सरासरी २००० रुपये. फ्लॉवर २०० ते ६०० तर सरासरी ४०० रुपये. गाजर १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये. गवार ६००० ते १३६०० रुपये तर सरासरी ९००० रुपये. घेवडा २००० ते ३००० रुपये तर सरासरी २५०० रुपये. कैरी ३००० ते ५००० रुपये तर सरासरी ४००० रुपये. काकडी ७०० ते २००० रुपये तर सरासरी १३०० रुपये.

कारली २००० ते ४००० रुपये तर सरासरी ३००० रुपये, कोबी २०० ते ५०० रुपये तर सरासरी ४०० रुपये. लसूण ३५०० रुपये ते ५००० रुपये, तर सरासरी ४००० रुपये. ढोबळी मिरची १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये. शेवगा १००० ते १५०० रुपये, तर सरासरी १२५० रुपये. दोडका ३५०० ते ४००० रुपये तर सरासरी ३८०० रुपये. टोमॅटो ५०० ते ७०० रुपये तर सरासरी ६०० रुपये.

तोंडली १६०० ते २००० रुपये तर सरासरी १८०० रुपये. वालवड सरासरी ३५०० रुपये. वांगी ४०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये. पिकेडोर ५०० ते २००० रुपये तर सरासरी १२०० रुपये. भुईमूग शेंग ओली सरासरी ५००० रुपये. मिरची हिरवी ३००० ते ५००० रुपये तर सरासरी ४००० रुपये. कढी पत्ता सरासरी २० रुपये जुडी, कोथिंबीर ३ ते १५ रुपये, सरासरी ९ रुपये.

कांदा पात सरासरी १० रुपये. मेथी ५ ते ६ रुपये तर सरासरी ६ रुपये. मुळा १ ते २ रुपये तर सरासरी २ रुपये. पालक ४ ते ५ रुपये तर सरासरी ५ रुपये, पुदिना सरासरी ६ रुपये. शेपू ४ ते ५ रुपये तर सरासरी ५ रुपये, असा भाव मिळाला. हे दर राहाता बाजार समितीमधील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe