कांदा बियाणे विकून ‘या’ शेतकऱ्यांनी मिळवला लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi news:- शेतकऱ्यांने जर कांदा लागवडी पेक्षा कांदा बियाणे उत्पादित केले व उत्पादित केलेले बियाणे विकून देखील तो भरघोस नफा मिळू शकतो.

याचाच प्रत्यय औरंगाबाद जिल्ह्यातील आडुळ येथील शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी कांदा बियाणे उत्पादित करून लाखो रुपयांचा नफा मिळवण्याची किमया साधली आहे.

सध्या मराठवाड्यातील शेतकरी हे कांद्याचे वाढते भाव पाहता कांदा लागवडीकडे वळालेले आपणाला दिसत आहेत. त्यामुळे कांदा क्षेत्रात वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्रामुळे कांदा बियाणांच्या मागणीदेखील त्याच प्रमाणात वाढली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातही काहीसं असंच चित्र आहे.शेतकरी बांधवांनी कांदा या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आहे.त्यामुळे जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

याचा फायदा शेतकरी बबनराव आसाराम पिवळ यांनी घेण्याचे ठरवले आणि आधुनिक पद्धतीने कांदा बियाण्याचे उत्पादन घेऊन बक्कळ नफा मिळवला.

या शेतकऱ्याने उत्पादित केलेले कांदा बियाणे हे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली असल्यामुळे त्यांना बाजारपेठेत जाण्याची देखील गरज पडली नाही.

या शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेतीत केलेला पिकांवरील खर्च देखील निघणे अवघड झाले होते. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करून कांदा लागवड करण्यापेक्षा कांद्याचे बियाणे उत्पादित करण्यातच लक्ष घातले आणि आता या शेतकऱ्याला याचा फायदा मिळत आहे.

गेली दोन वर्षे बबनराव कांदा बियाणे उत्पादित करत आहेत.त्यांना पहिल्याच वर्षी एक लाख 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

सलग दोन वर्षे कांदा बियाणे उत्पादित करून त्यांना चांगला नफा राहिल्याने यंदा कांदा बियाणे अडीच एकर क्षेत्रात लागवड केले आहे. बबन यांना यंदा तब्बल चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा अनुमान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe