Maharashtra : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत कोणत्या ना कोणत्या विधानावर वादात सापडत असतात. आता राज्यपालांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांचे धोतर फाडणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत.
औरंगाबाद येथील विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान कारक वक्तव्य केल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पुण्यातील काही चौकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धोतर फाडणाऱ्यांना १ लाखांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. राज्यपालांचा निषेध करत अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत.
पुण्यातील वेगवेगळ्या मुख्य पाच चौकामध्ये असे बॅनर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यामुळे राज्यपालाच्या वक्तव्यावरचा वाद आता चांगला चिघळताना दिसत आहे.
औरंगाबाद मध्ये राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. आता नवे आदर्श नितीन गडकरी हे तुमच्यासमोर बसले आहेत असे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळून आल्याचे दिसत आहे.
संभाजी ब्रिगेडच्या अनेक संघटना देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राज्यपालांच्या निषेधार्त आंदोलने केली जात आहेत.