अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
मात्र, असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यावर जमा होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. कारण योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी मध्यंतरी अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
यादीत असे तपासा तुमचे नाव
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावे लागेल. तेथे होमपेजवर तुम्हाला Farmers Corner असा पर्याय दिसेल. Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. अशी तपासा हप्त्याची स्थिती वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक करा.
यानंतर Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.
नाव नसेल तर काय करावे?
PM किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर लाभार्थी PM किसान सन्मान निधीच्या हेल्पलाइनवर कॉल करू शकतो. हे क्रमांक आहेत 155261 आणि 011-24300606. इथे तुमची समस्या दूर होईल
कशामुळे सुरु झाली योजना?
शभरात 86 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यांना पायाभूत सोईसुविधा मिळाव्यात त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा निर्धारच केंद्र सरकारने केलेला आहे.
पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता.
आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना त्यांनी हे सांगितले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम