CBSE :12 वीचा निकाल जाहीर; येथे पहाता येईल निकाल

Published on -

Maharashtra News:सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. आज २२ जुलैला हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी २६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

येथे पहाता येईल निकाल :
विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी. येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदींची माहिती प्रविष्ट करून सबमिट करा. यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचा परीक्षेचा निकाल दिसून येईल.

सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbse.gov.in, cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून बघाता येणार आहे. याशिवाय digilocker.gov.in आणि results.cbse.nic.in यावरही बघता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News