संगमनेरच्या रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी मंजूर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे.

त्यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. ते म्हणाले, तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोनातही मंत्री थोरात यांनी वाडी-वस्तीच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

गावोगावी सिमेंट बंधारे, नाला बिल्डिंग, सभागृह, शाळा खोल्या, सभामंडप, पाणी-आरोग्य-लाईट-गटार व्यवस्था, शासकीय इमारती व मजबूत रस्ते मंत्री थोरातांच्या माध्यमातून निर्माण झाले आहे. तसेच विविध विकास योजना सातत्याने राबवल्या जात आहे.

यामुळे संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. या सर्व कामांना सुरुवात होणार असून तालुक्यातील गावांना दळणवळणाची चांगली सुविधा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News