Ducati India च्या ‘या’ खतरनाक बाईकवर 2 लाखांची सूट, जाणून घ्या ऑफरसह बाईकचे फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Ducati Monster

सध्या स्पोर्ट बाईकची क्रेझ आहे. Ducati India च्या बाईक्सचा जलवा या स्पोर्टप्रेमींमध्ये दिसून येतो. आता ही कंपनी आपल्या खतरनाक बाइक मॉन्स्टरवर खूप सूट देत आहे. जर तुम्ही देखील स्पोर्ट बाईकचे चाहते असाल व तुम्हीही अशीच बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या साठी अत्यंत भारी ऑफर आहे.

डुकाटी इंडियाने आपल्या मॉन्स्टरवर 1.97 लाख रुपयांची सूट जाहीर केली आहे. या बाईकची ओरिजनल किंमत 12.95 लाख आहे. पण या ऑफरनंतर ही बाईक रुपयांवरून 10.99 लाख रुपयांना विकत घेता येणार आहे. कंपनीने ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. चला आपण अधिक जाणून घेऊयात.

डुकाटी मॉन्स्टर मध्ये तगडे इंजिन

डुकाटी मॉन्स्टर स्टँडर्ड आणि एसपी या दोन व्हेरिएंटमध्ये येते. यातील इंजिन देखील अत्यंत पॉवरफुल आहे. यात 937cc लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन जी 9,250rpm वर 110bhp आणि 6,500rpm वर 93Nm पॉवर जनरेट करते. या बाईकमध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स देखील आहेत.

जाणून घेऊयात इतर फीचर्स

या बाईकमध्ये 4.3-इंच फुल-कलर टीएफटी पॅनल, डायनॅमिक टर्न सिग्नल, मोबाइल चार्ज करण्यासाठी USB कनेक्टर, कॉर्नरिंग ABS आणि पॉवर लॉन्च आदी फीचर्स पाहायला मिळातील. सोबतच या बाइकमध्ये तीन रायडिंग आणि पॉवर मोड देखील आहेत. या बाइकमध्ये 43mm अप-साइड-डाउन फोर्क्स आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशॉक देखील मिळेल. यात ड्युअल 320mm फ्रंट डिस्क आणि सिंगल 245mm रियर डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहे.

काय आहे नेमकी ऑफर

या शानदार डुकाटी मॉन्स्टरवर जवळपास 1.97 लाख रुपयांचा डिस्काउंट आहे. ही ऑफर तुम्हाला
30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मिळणार आहे. ही डिस्काउंट ऑफर असल्याने ही बाईक तुम्हला आता 12.95 लाख रुपयांऐवजी 10.99 लाख रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही ती 30 नोव्हेंबरपूर्वी बुक केली पाहिजे. असे केले तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe