अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्हा परिषदेच्या लाडजळगाव गटातील विविध विकास कामांसाठी ४ कोटी ७ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती गटाच्या सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी दिली.
गेल्या वर्षापासून कोविड-१९ च्या साथीमुळे जिल्हा परिषदच्या निधीमध्ये कपात झाली होती; परंतू यावर्षी विकास कामांसाठी जिल्हा परिषदेमधून निधी मंजूर केला आहे.
यामध्ये ठाकूर पिंपळगाव व ठाकूर निमगाव येथे आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी प्रत्येकी ८८ लाख रुपये मंजूर झाले असून, खरडगाव-४, आधोडी-२, मंगरूळ खुर्द-२ व सुळेपिंपळगाव येथे १ शाळा खोली मंजूर करण्यात आली असून, प्रत्येकीसाठी ८ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
तसेच सालवडगाव ते मुर्शदपूर रस्त्यासाठी ३० लाख, अंतरवाली बु. ते चापडगाव रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंगरूळ बु. येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी १० लाख, वरखेड येथे स्मशानभूमी बांधकामासाठी ५ लाख,
श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान (नागलवाडी) येथे भक्तनिवास इमारतीसाठी १५ लाख, कोळगाव येथे साठवण बंधाऱ्यासाठी १५ लाख, लाडजळगाव येथील ढाकणे वस्तीवरील बंधाऱ्यासाठी १५ लाख, नागलवाडी बंधाऱ्यासाठी १५ लाख,
कोळगाव येथील कोरडे वस्तीवर पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी २ लाख, हसनापूर येथे शिववस्तीवर पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी २ लाख, हायमॅक्स बसविण्यासाठी ९ लाख, माळेगाव ने गावांतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी ४ लाख, खरडगाव झिरपे वस्ती रस्त्यासाठी २ लाख,
हसनापूर रस्ता दुरुस्तीसाठी ५० हजार तसेच शेकटे बु. व शिंगोरी, गोळेगाव आंबेडकर-नगर, गोळेगाव-इंदिरानगर व्यायाम शाळेसाठी एकूण १४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सौ. हर्षदा काकडे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम