जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा ‘या’ दोन नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला…!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून, एकूण ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. राज्यातल सत्तांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे.

त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आंबितखिड, बाभुळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, जामगाव, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहडी, कोंदनी, लव्हाळी ओतूर,

माळेगाव, मान्हेरे, मवेशी, म्हाळुगी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पळसुंदे, पांजरे, पिंपरकणे, राजूर, रणदखुर्द- बु., समशेरपूर, सांगवी, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बु., टाहाकरी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे व वारंघुशी या ४५ गावाच्या निवडणूकीचे मतदान सुरु झाले आहे.

या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अखेर जनता कोणाला पसंत करते ते निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe