जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत 50 खोके एकदम ओके हा डायलॉग म्हटला जाईल- अमोल मिटकरी

Published on -

Maharashtra News:पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात जर काय गाजले असेल तर ते म्हणजे 50 खोके एकदम ओके हा डायलॉग.

या घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ देखील झाला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जो पर्यंत सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत हा डायलॉग म्हटलं जाईल असे म्हटले आहे.

तेवढेच नाही तर या आमदारांचे नातू देखील हा डायलॉग म्हणतील असे अमोल मिटकरी म्हणाले. आदित्य ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

बाळासाहेबांच्या फोटोचा वापर न करता शिंदे गटाने निवडून येऊन दाखवावं असे आव्हान देखील अमोल मिटकरी यांनी यावेळी केले.

विधानभवनासमोर झालेल्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावेळी आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार घमासान झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!