घरातून ५० हजारांची रोकड व दागिने लांवबले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोपरगाव तालुक्यात रवंदे येथील सताळी रोड वर असलेल्या थोरात वस्तीवर रात्री दहा वाजे नंतर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व घरातील ३० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे दागिने, पन्नास हजारांची रोख रक्कम, एक मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

याप्रकरणी शिवाजी नामदेव थोरात यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी थोरात हे आपल्या कुटुंबियासंवेत सताळी रोडनजीक गावापासून काही अंतरावर राहतात.

ते पहाटे साडेचार वाजता आपल्या कामासाठी उठले असता त्यांना आपले घर उघडे दिसले.

त्यावेळी त्यांना संशय आला असता त्यांनी घरात जाऊन पहिले असता घराचे कुलूप तोडून घरातील त्यांच्या सामानाची उचक -पाचक केलेली आढळून आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe