अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-5G तंत्रज्ञान सध्या काळाची गरज आहे’. ‘भारताला 5G सेवांच्या नेटवर्क बाबतीत ठोस निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर पुढील पिढी या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकणार नाहीत.
असे प्रतिपादन नोकिया इंडियाचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख अमित मारवाह यांनी केले आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते भारतात पुढील 3 महिन्यात 5G तंत्रज्ञान येऊ शकते.
सुरूवातीच्या काही दिवसात ही सेवा मर्यादित ठिकाणी सुरू असेल. कारण 5G तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या ऑप्टीकल फायबरची पायाभूत रचना अजूनही पूर्णतः तयार नाही.
या क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी अद्यापही खूप काम करण्याची गरज आहे. 5G नेटवर्कवरून अल्ट्रा एचडी क्वॉलिटीचे व्हिडिओ कॉलिंगसुद्धा केली जाऊ शकते.
सोबतच स्मार्ट डिवाइसेसमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी मिळेल. ज्याने आपले आयुष्य अतिशय वेगवान होण्यास मदत मिळणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|