Vivo भारतात आपले नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला Vivo T4x 5G लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर या फोनचे टीझर जारी केले असून, सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी असणार असल्याचा दावा केला जात आहे. हा फोन पूर्वीच्या Vivo T3x 5G चा उत्तराधिकारी असेल आणि Vivo T सीरीजचा 2025 मधील पहिला स्मार्टफोन म्हणून बाजारात येईल.
Vivo T4x 5G फीचर्स
Vivo T4x 5G ची 6500mAh बॅटरी या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरणार आहे. 15,000 रुपयांच्या आत हा फोन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 20 फेब्रुवारीला हा फोन अधिकृतरीत्या लॉन्च केला जाईल, असा संकेत कंपनीने दिला आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसर
Vivo T4x 5G मध्ये 6.72-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. ब्राइटनेस 1000 nits पर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे फोनचा स्क्रीन सूर्यप्रकाशातही उत्तम दिसेल. Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर या फोनमध्ये वापरण्यात येईल.
कॅमेरा सेटअप
फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. कमी प्रकाशातील उत्तम फोटोग्राफीसाठी सुपर नाईट मोड देखील दिला जाईल. तसेच, फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
Vivo T4x 5G मध्ये 6500mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या मोठ्या बॅटरीमुळे फोन सहज 2 दिवसांचा बॅकअप देऊ शकतो.
सॉफ्टवेअर आणि इतर फीचर्स
फोन Android 14 OS वर आधारित Funtouch OS 14 वर चालेल. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर आणि 5G कनेक्टिव्हिटी यासारखी प्रीमियम फीचर्सही मिळण्याची शक्यता आहे.
Vivo T4x 5G ची किंमत
Vivo T4x 5G 15,000 रुपयांच्या आत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा फोन बजेट श्रेणीतील सर्वाधिक बॅटरी क्षमता असलेला 5G स्मार्टफोन ठरू शकतो.
कधी होईल लाँच ?
20 फेब्रुवारी 2025 रोजी Vivo T4x 5G भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या बॅटरी आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह हा स्मार्टफोन अनेकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.