7th Pay Commision : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! डीए थकबाकीबाबत लवकरच सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

Published on -

7th Pay Commision : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central staff) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. डीए (DA) थकबाकीबाबत लवकरच सरकार निर्णय घेऊ शकते, असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हाती चांगलीच रक्कम (Amount) येईल.

डीए थकबाकीच्या प्रतीक्षेत कर्मचारी

सरकार ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांचा थकित डीए भरू शकते. मात्र, याआधी सरकार कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी (Arrears) देऊ शकते, असे वृत्त आले होते, मात्र सरकारने त्यास नकार दिला होता. कर्मचारी अद्यापही डीएच्या थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत.

वित्त मंत्रालयाच्या (Ministry of Finance) कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

कोरोनामुळे डीए बंद झाला

कोरोना (Corona) महामारीमुळे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा डीए बंद केला होता. त्याच्या सुटकेसाठी कर्मचारी अनेक दिवसांपासून मागणी करत होते, मात्र सरकारकडून अपेक्षा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

केंद्र सरकारने डीएच्या थकबाकीचा एकरकमी तोडगा काढल्यास विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळी रक्कम जारी केली जाईल.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढणार आहे.

वर्षभरात जानेवारी आणि जुलैमध्ये DA सुधारित केला जातो. वाढती महागाई आणि अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आकडेवारीवरून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News