7th Pay Commission : देशातील केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेटवस्तू दिली जाऊ शकते. तसेच आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्र सरकारकडून 2024 मध्ये अद्याप DA वाढवण्यात आला नाही. मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारकडून या वर्षातील पहिली DA वाढ केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या DA सोबत त्यांचा DR देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते तर DR मध्ये देखील दोन वेळा वाढ करण्यात येत असते. मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के DA दिला जात आहे.
जानेवारी ते जून या कालावधी दरम्यान पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर दरम्यान दुसरी DA वाढ केली जात असते.
मागच्या वेळी DA कधी वाढला होता
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची शेवटची DA वाढ मागील वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये करण्यात आली आहे. त्यावेळी देखील सरकारकडून 4 टक्के वाढ करण्यात आली होती. 4 टक्के वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा DA 46 टक्के झाला आहे.
DA-DR कोणत्या आधारावर ठरवले जाते?
ACPI डेटावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ ठरवली जाते. दरमहा CPI-IW डेटा कामगार मंत्रालयाकडून सादर केला जात असतो.
आता देखील हा डेटा सादर केली जाण्यची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.