7th Pay Commission: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता तब्बल 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता रेल्वेमधील पर्यवेक्षक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या नवीन सिस्टमला मंजुरी मिळाली आहे.
या नवीन सिस्टम अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना गट अ पर्यंत पदोन्नती देता येईल. या निर्णयाचा फायदा 80 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची ही मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती, जी रेल्वेने मान्य केली आहे. या नव्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या काहीही फरक पडणार नाही.
48 हजारांपर्यंत पगार वाढणार आहे
भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे सक्षम लोकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्यामुळे त्यांचा पगार अडीच ते चार हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. म्हणजेच त्यांना 48 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
वंदे भारत ट्रेनबाबत मोठा निर्णय
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसोबत घडलेल्या काही घटना पाहता हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ते म्हणाले की, येत्या 5-6 महिन्यांत 100 किमीपर्यंतची सीमारेषा तयार केली जाईल, जेणेकरून वंदे भारत ट्रेनची जनावरांशी होणारी टक्कर थांबवता येईल.
हे पण वाचा :- Recharge plan: ‘हे’ आहे नंबर चालू ठेवण्यासाठी सर्वात स्वस्त रिचार्ज ! पहा संपूर्ण लिस्ट