7th Pay Commission : केंद्र सरकारने (Central Govt) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सणासुदीच्या काळात केंद्र सरकार रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway employees) ७८ दिवसांचा बोनस देणार आहे. त्यामुळे यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 12 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी ट्विटमध्ये बोनस मंजूर केल्याबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. रेल्वेमधील उत्पादकता लिंक्ड बोनसमध्ये देशभर पसरलेल्या सर्व नॉन-राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांचा (RPF/RPSF कर्मचारी वगळता) समावेश होतो.
Thanks to PM @narendramodi Ji on behalf of entire rail parivar for sanctioning the productivity-linked bonus for 78 days. pic.twitter.com/PI3bexCXQC
— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) October 1, 2022
तुम्हाला सांगतो की, यापूर्वी ७२ दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने बोनस दिला जात होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून ७८ दिवसांच्या पगाराच्या आधारे बोनस दिला जात आहे. या निर्णयामुळे रेल्वेवर सुमारे १८३२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
यापूर्वी ७२ दिवसांच्या पगाराप्रमाणे बोनस (Bonus) दिला जात होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून ७८ दिवसांच्या पगारावर बोनस दिला जात आहे. अधिकृत निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून काम करेल. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीही हा बोनस मिळाला होता. रेल्वे कर्मचाऱ्याला ३० दिवसांमागे ७००० रुपये बोनस मिळत असल्याने, या परिस्थितीत कर्मचाऱ्याला दिवाळीच्या ७८ दिवसांसाठी १८००० रुपये बोनस मिळेल.