7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! जून महिन्यात मिळणार डीएची एवढी थकबाकी

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) लवकरच आनंदाची मिळण्याची शक्यता आहे. कारण लवकरच केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) ही कर्मचाऱ्यांची खाती भरण्याच्या तयारीत आहे. जून महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थकीत डीए ची (DA) रक्कम येणार असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्र सरकारनंतर (Central Goverment) अनेक राज्यांनीही डीए (महागाई भत्ता) वाढवला आहे. अनेक राज्यांतील कर्मचाऱ्यांचा डीएही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 34 टक्के इतका आहे. त्याच वेळी, महाराष्ट्र सरकार देखील आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सांगू शकते.

महाराष्ट्र सरकारने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत थकबाकीचा (Arrears) तिसरा हप्ता देण्याची घोषणा केली आहे. सरकारने आधीच 2 हप्ते जारी केले आहेत आणि सुमारे 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या हप्त्यांचा थेट लाभ मिळणार आहे.

सन 2019 मध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना तसेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना त्यांची पाच वर्षांची थकबाकी 2019-20 पासून पाच हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला.

आता कुठे कर्मचाऱ्यांना 2 हप्ते मिळाले आहेत. आता कुठे तिसरा लवकर येणे अपेक्षित आहे आणि नंतर चौथा आणि पाचवा हप्ता शिल्लक राहणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा एकदा वाढणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास १ जुलैपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते.

खरं तर, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत पुन्हा एकदा वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी 4 टक्के वाढ अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe