7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात पुन्हा वाढणार पगार, सरकार घेणार मोठा निर्णय

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार प्रत्येक 6 महिन्यांनी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते. महागाईचा दर पाहता हा महागाई भत्ता वाढवला जातो. महागाई जेवढी जास्त तितका महागाई भत्त्यामध्ये वाढ होते.

काही दिवसांपूर्वी सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात कमालीची वाढ झाली होती. अशातच आता या कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. लवकरच सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

पुन्हा होणार डीएमध्ये वाढ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार या वर्षी म्हणजे जुलैमध्ये महागाई भत्त्यात पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. DA आणि DR वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित करण्यात येतात. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत देण्यात येते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये, कामगार मंत्रालयाने DA गणना सूत्र सुधारित केले आहे. महागाई भत्त्याचे मूळ वर्ष बदलले असून वेतन दर निर्देशांक (WRI-मजुरी दर निर्देशांक) ची नवीन मालिका जारी केली आहे. आधार वर्ष 2016 = 100 सह WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 ची जुनी मालिका बदलली असल्याचे असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

अशी करण्यात येते DA ची गणना

केंद्र सरकार एका सूत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांसाठी डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते.

महागाई भत्ता टक्केवारी = (गेल्या 12 महिन्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष 2001=100) 126.33)/126.33) x100

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी: (गेल्या तीन महिन्यांतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100)-126.33)/126.33)x100

किती झाली पगारात वाढ ?

केंद्र सरकारकडून मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीचा थेट फायदा 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना झाला आहे. समजा जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे 42,000 रुपये असेल तसेच मूळ वेतन सुमारे 25,500 रुपये असेल, तर त्याला/तिला महागाई भत्ता म्हणून 9,690 रुपये दिले जातील. डीएमध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर 10,710 रुपये महागाई भत्ता दिला जात आहे. यात प्रत्येक महिन्याला पगारात 1,020 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe