7th Pay Commission : कर्मचाऱ्यांचा पगार १८००० वरून २६००० होणार ! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार (Central Goverment) लवकर एक महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Staff) मूळ वेतनात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून करत आहेत.

त्यांना लवकरच यासंबंधी काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील कॅबिनेट बैठकीत फिटमेंट फॅक्टरवर (Fitment factor) चर्चा होऊ शकते. मोदी सरकारने हिरवा कंदील दिल्यास 18 हजार रुपये मूळ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते.

मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणार आहे.सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळतो, तो 3.68 टक्के केला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 8,000 रुपयांची वाढ होईल.

याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. कर्मचार्‍यांचा पगार एवढा वाढेल की फिटमेंट फॅक्टर 3.68 वर वाढवला तर कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल.

आता जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार रु. 46,260 (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680).

यापूर्वी, हे मूळ वेतन होते, केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. एंट्री लेव्हल बेसिक पे 7,000 रुपये प्रति महिना वरून 18,000 रुपये करण्यात आले,

तर उच्च स्तरावरील म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले. वर्ग 1 अधिकार्‍यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते. सेन्सेक्सने 1400 अंकांची उसळी घेतली, बाजारात एवढी वाढ का झाली?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe