7th Pay Commission Update : खुशखबर ! या तारखेला वाढणार कर्मचाऱ्यांचा DA, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Ahmednagarlive24 office
Published:
7th Pay Commission Update

7th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी या महिन्यात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत काम करण्यास सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची चर्चा सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्या DA सोबत DR देखील वाढवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

वर्षातून दोन वेळा DA वाढ केली जाते

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा DA वाढ केली जाते. जानेवारी ते जून महिन्यात पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर या दरम्यान कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ केली जाते. यावर्षी कर्मचाऱ्यांची पहिली DA वाढ 4 टक्क्यांनी केली जाण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 20 मार्च रोजी वाढ केली जाऊ शकते. केंद्र सरकारकडून होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना DA वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. होळीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत DA वाढीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.

DA थकबाकी मिळेल

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ केली गेली तरी जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना DA वाढीचा लाभ दिला जाईल. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA 50 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने DA दिला जात आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत निर्णय घेतल्यास याचा फायदा 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत सकारात्मक पाऊले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe