8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होणार आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
दरम्यान नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी दर 10 वर्षांनी लागू केल्या जातात. जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल. माहितीनुसार निवडणुकीपूर्वी या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घेऊयात संपूर्ण गणित.

लवकरच लागू होणार नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी
हे लक्षात ठेवा की 2013 मध्ये 7 वा वेतन आयोग स्थापन केला होता. त्यानंतर 2016 मध्ये त्याची अंमलबजावणी झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशातच आता कर्मचाऱ्यांचे नशीब पुन्हा बदलणार असून नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी दर 10 वर्षांनी लागू करण्यात येतात.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता देण्यात येत आहे. परंतु, त्याअगोदर 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यावर्षी केंद्र सरकारकडून जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तसेच आता जुलैमध्येही महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते.
निवडणुकीपूर्वी मिळणार आनंदाची बातमी
माहितीनुसार, केंद्र सरकार 8 व्या वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना नंतर आनंदाची बातमी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पगारात होणार वाढ
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार 18,000 रुपये ते 56,900 रुपये प्रति महिना इतका आहे. परंतु, नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊन फिटमेंट फॅक्टरही वाढेल.