BSNL Plan : नवीन वर्षात BSNL चा ग्राहकांना मोठा धक्का! केले स्वस्त रिचार्ज प्लॅन महाग

BSNL Plan : नवीन वर्षात भारत संचार निगम लिमिटेडने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. काही स्वस्त प्लॅनच्या किमती कंपनीने वाढवल्या आहे. त्यामुळे या ग्राहकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार हे नक्कीच.

BSNL ने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्लॅन्सचे फायदे कमी केल्याची माहिती समोर आली होती. पुन्हा एकदा नव्या वर्षात कंपनीने आणखी तीन प्लॅन्सचे फायदे कमी केले आहेत.

बीएसएनएलने रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. वास्तविक, कंपनीने निवडलेल्या प्लॅनची वैधता कमी केली आहे. त्यामुळे प्लॅनच्या किमती आपोआप वाढल्या आहेत.

नंबर 1 

269 ​​रुपयांच्या प्लॅनमध्ये आता ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळत आहे. पूर्वी 30 दिवसांची वैधता मिळायची. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 2GB डेटा आणि दररोज 100 SMS देते. झिंग, बीएसएनएल ट्यून आणि गेमिंग सारखे अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.

नंबर 2 

769 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता ग्राहकांना 75 दिवसांची वैधता मिळत आहे. पूर्वी 80 दिवसांची वैधता मिळायची. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 2GB डेटा आणि दररोज 100 SMS देते. झिंग, बीएसएनएल ट्यून आणि गेमिंग सारखे अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.

नंबर 3 

आता 769 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता देत आहे. पूर्वी 90 दिवसांची वैधता मिळायची. यामध्ये  अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, 2GB डेटा आणि दररोज 100 SMS देते. झिंग, बीएसएनएल ट्यून आणि गेमिंग सारखे अतिरिक्त फायद्यांचा समावेश आहे.