अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- खोदकाम करताना सापडलेल्या गुप्तधनापोटी अकरा लाख रुपये देण्याचे अश्वासन देवून नकार दिला.
तसेच मानसिक व शारिरीक छळ केल्याचा आरोप गुप्तधन खोदकाम करणारा मयत सुनिल गायकवाड याच्या पत्नीने केला असुन त्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बेलपूरातील खटोड बंधुवर गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत गुप्तधनाचे खोदकाम करणारा मजुर मयत सुनिल गायकवाड याची पत्नी वंदना सुनिल गायकवाड हीने श्रीरामपुर शहर पोलीसात दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
वट पौर्णिमेच्या दिवशी माझे पती सुनिल गायकवाड हे दोन मजुरांना सोबत घेवुन राजेश व हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस मोकळ्या जागेत झाडे लावण्यासाठी मजुरीने खड्डे खोदण्याच्या कामासाठी गेले होते.
ते काम संपवून घरी आल्यानंतर मला सांगितले की,हनुमंत खटोड यांचे घराचे मागील बाजुस झाडे लावण्यासाठी खड्डा खोदत असताना एक तांब्याचा हंडा सापडला त्यात वर चांदी व खाली सोने होते.
हंडा पुर्णपणे भरलेला होता.खड्डा खोदताना हंड्याला धक्का लागला;त्यामुळे त्यातील नाणी खाली पडली.त्या नाण्यांना हात न लावता ती फावड्याच्या सहाय्याने पुन्हा हंड्यात टाकली.
त्या नंतर ही बाब राजेश व हनुमंत खटोड यांना सांगितली की,खोदकाम करताना हंडा सापडला आहे ते दोघेही तेथे आले. त्यातील सोने व चांदीची नाणी पाहून राजेश व हनुमंत खटोड यांनी सांगितले की,तु सदर हंडा सापडल्याचे कुणालाही सांगु नको.तुला अकरा लाख रुपये देतो.
त्यापैकी एक लाख २८ हजार रुपये माझ्या पतीला रोख दिले.या घटने नंतर माझे पती सुनील गायकवाड हे त्यांनी दिलेल्या अश्वासनामुळे राहीलेले दहा लाख रुपये मागण्यासाठी वेळोवेळी राजेश व हनुमंत खटोड यांचेकडे गेले.
त्या त्या वेळेस राजेश व हनुमंत खटोड यांनी माझे पतीला पैसे न देता शिवीगाळ करुन मारहाण केली हा प्रकार पतीने घरी आल्यानंतर मला सांगीतला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम