अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- प्रवरानगर येथील रहिवाशी व डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न संस्थेतील कामगाराच्या तोंडाला काळे फासणाऱ्या राहुरीच्या स्थानिक कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश दिनकर खर्डे राहणार भगवतीपुर तालुका राहुरी या कामगाराने याप्रकरणी फिर्याद दिल्याने इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे व इतर पाच अनोळखी कामगारांविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यात अकाउंटंट म्हणून नोकरी करत आहे.
ही सेवा साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या विवेकानंद नर्सिंग होमच्या बाहेर असताना गैर कायद्याची मंडळी एकत्र येवून तोंडाला काळे फासले यावरून संबंधित कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम