FD Interest : कमाईची सुवर्णसंधी! ‘या’ दोन खाजगी बँका देत आहेत एफडीवर सगळ्यात जास्त व्याज

Published on -

FD Interest : जर तुम्ही एफडीमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकराच्या 80 C कलमाअंतर्गत कर सवलत मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एफडींसाठी पाच वर्षांचा लॉकइन पिरिएड असून गुंतवणूकदारांना त्याआधी रक्कम काढता येत नाही.

त्यामुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतावणूक करतात. परंतु, सर्वात आनंदाची बाब म्हणजे की सरकारी बँकांपेक्षा खाजगी क्षेत्रातील बँका आता त्यांच्या ग्राहकांना सरावात जास्त व्याज देत आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही एफडी केली नसेल तर आताच करा.

IDFC फर्स्ट बँक व्याज दर

सुधारित एफडी दरांनंतर, IDFC फर्स्ट बँक रु. 2 कोटींपेक्षा कमी FD वर किमान 3.50% तसेच कमाल 7.75% व्याज देत आहे. तर खासगी बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याज देत आहे. हे लक्षात घ्या की हे नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. IDFC First Bank FD वर व्याजदर सुधारल्यानंतर 7 ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज देत आहे. तर 30-45 दिवसांच्या FD वर 4% तर 46-90 दिवसांच्या FD वर 4.50% व्याजदर आहे.

मिळत आहे या एफडीवर सर्वात जास्त व्याज

या बँकेच्या 91-180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5% आणि 181-366 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.75% व्याज मिळत आहे. 549 दिवसांपासून ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर कमाल 7.75% व्याज उपलब्ध असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना यावर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. तर IDFC फर्स्ट बँक 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर कमाल 7.60% आणि किमान 5.25% व्याज देत आहे.

जाणून घ्या इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे एफडी दर

या बॅँकेने देखील 1 मार्चपासून FD वर व्याज वाढवले ​​आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजात वाढ केली असल्याने ग्राहकांना आता 7 दिवस ते 29 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 3.5% आणि 30-45 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4% व्याज मिळत आहे. बँक 888 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वात जास्त 8.20% व्याज देत आहे. बँक 3 वर्षे, 1 दिवस ते 4 वर्षांच्या FD वर 7.25% आणि 4 वर्षे, 1 दिवस ते 5 वर्षे आणि 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 7% आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe