FD Rates : सुरक्षित गुंतवणुकीसोबतच परताव्याची हमी देण्यासाठी सरकारी बँकांसोबतच खाजगी बँका मुदत ठेव योजना सुरु करत असतात. मागच्या महिन्यात आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केली आहे.
त्यानंतर जवळपास सर्व बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी कमाई करण्याची संधी आहे. आता बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एफडीचे व्याज वाढवले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा जाणून घ्या एफडी दर
ही बँक 7-4 दिवसांत परिपक्व होणार्या FD वर 3.00%,15-45 दिवसांत परिपक्व होणार्या ठेवींवर 3.25% व्याजदर, 46 ते 59 दिवसांत परिपक्व होणार्या FD वर 4.25%, 60 ते 90 दिवसांत परिपक्व होणार्या FD वर 75 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे.
91 ते 179 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4.50% व्याज,180 ते 364 दिवसांत परिपक्व होणार्या ठेवींवर व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. त्यामुळे यावरील व्याज 5.25% वरून 5.50% इतके झाले आहे.
तसेच या बँकेने एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 6.15% ते 6.75% वाढ केली आहे. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज 6.00% वरून 6.50% व्याज, 3 ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वरील व्याज 5.75% वरून 6.00% पर्यंत वाढले आहे.