OnePlus 5G : शोधूनही सापडणार नाही अशी जबरदस्त ऑफर! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार OnePlus 5G

Published on -

OnePlus 5G : वनप्लसने नुकताच आपला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करता येणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणली आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर या स्मार्टफोनची किंमत 66,999 रुपये इतकी आहे. तुम्ही हा स्मार्टफोन आता 61,999 रुपयांना विकत घेऊ शकता. ICICI बँकेचे कार्ड असणाऱ्यांना 6,000 रुपयांपर्यंतची सूट आणि एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 10,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ग्राहकांना 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला असून हा LTPO तंत्रज्ञानासह येतो. तसेच 120Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देत आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळते.

प्रोसेसर म्हणून कंपनी ग्राहकांसाठी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी कंपनीने दिली आहे. ही बॅटरी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. त्याशिवाय हा फोन 50W AIRVOOC चार्जिंगला सपोर्ट करतो. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe