कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- पुणतांबा येथील कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

अंदाजे १५ हजार भाविकांनी करोना नियमांचे पालन करून दर्शन घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्तिक स्वामी देवस्थानच्या प्रशासनाने गुरुवार दि. १८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ १२ वाजता सुरू झाल्यानंतर

येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामानंदगिरी महाराज, आचार्य भगवान महाराज या मंहतांच्या हस्ते कार्तिक स्वार्मीच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजा करून ज्या भक्तांना दर्शनासाठी इच्छा होती त्यांना प्रवेश दिला.

रात्री दीड वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दर्शन घेतले. शुक्रवार सकाळी ५ वाजेपासून भाविकांची वर्दळ सुरू झाली. प्रशासनाने दर्शन बारीची व्यवस्था केली होती.

महिला भाविकांनी दर्शन घेतल्यावर मंदिराच्या प्रांगणात पणत्यांमध्ये वाती लावून दिपोत्सव साजरा केला. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून कार्तिक स्वामी मंदिर प्रशासन, भक्त मंडळ, सरपंच डॉ. धनजंय धनवटे यांचे सर्व सहकारी, बंदोबस्तासाठी असलेली पोलीस यंत्रणा, स्वंयसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe