अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये राशीन ते करमाळा रोडवरील एक दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले होते. व लाखोंचा माल लंपास केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहे. स्टेशनमधील एक टिम तयार केली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, तुळशीदास सातपुते,
पोलीस अंमलदार सागर म्हेत्रे, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गणेश भागडे यांचा समावेश होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये राहुल आबासाहेब जांभळकर,
वय -३० वर्षे, रा. राशीन यांनी गुन्हा दाखल केला होता. हे आरोपी पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस पथक तयार केले होते. हे आरोपी चोरीकरून बीडकडे गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी बीड येथे जावुन बीडमधील मोमीनपुरा भागातील सराईत गुन्हेगार सोयब कमरोउद्दीन शेख, वय २६ वर्षे, फारुख शेख ( फरार ) व सलमान शेख ( फरार )
यांना गुन्ह्यात निष्पन्न करून त्यांच्यापैकी सोयब कमरोद्दीन शेख याला अटक केले. त्याने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी व ७३९५० रुपये किमतीची १४७ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीवर बीडमध्ये चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम