ऑलम्पिक स्पर्धेतील पदकविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंवर आता बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे.

विविध राज्यांतील सरकारने तसेच उद्योगजगत व अन्य क्रीडाप्रेमी संस्थांनी खेळाडूंना नोकरी, रोख रकमेचे पारितोषिक तसेच विविध सुविधा बक्षीस म्हणून देण्याच्या घोषणा केल्या आहेत. नुकतेच टोकिया ऑलिम्पिक मध्ये भारताल पदक जिंकूण देणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने बक्षीस जाहीर केले आहे.

खेळाडूंसाठी बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर :- यामध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणार्‍या निरज चोप्राला 1 कोटी रुपये जाहिर करण्यात आले आहेत. तसेच देशाला रौप्य पदक मिळवून देणार्‍या मिराबाई चानू अन् रवीकुमार दहिया यांना प्रत्तेकी 50 लाख घोषीत करण्यात आलेत.

याबरोबरच देशाला कांस्यपदक मिळवून देणार्‍या पी.व्ही. सिंधू, लोव्हलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्तेकी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कास्यपदक पटकावणार्या भारतीय पुरुष हॉकी संघाला 1 कोटी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

भारताने हॉकीमध्ये तब्बल 41 वर्षांनंतर पदक पटकावले आहे. तर बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक मिळवले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रजतपदक मिळवून दिले.

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 16 ऑगस्ट रोजी पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहेत. तर रेल्वेकडूनदेखील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. वेटलिफ्टिंगध्ये रजतपदक मिळवून देणाऱ्या मणिपूरच्या मीराबाई चानूला एएसपी म्हणून नोकरी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी चानूला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी राज्याच्या ऑलिम्पिकपटूंना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतीय हॉकी संघाचा खेळाडू नीलकांता शर्माला मणिपूर आणि मध्य प्रदेश सरकारकडून बक्षीस देण्यात येणार आहे.

नीलकांताला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज यांनी 1 करोड रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. तर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नीलकांताला 75 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे नीलकांता हा रेल्वेमध्ये टीसीचे काम करत होता. त्याला आता मणिपूरमध्येच खेळाशी निगडीत सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe