अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने घुलेवाडीतील एक तरुण जखमी झाला होता. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक आपल्या वाहनासह पसार झाला होता.
नुकतेच जखमी तरुणाच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज शेख याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, स्वप्नील काशिनाथ घुले (वय 24) हा तरुण आपल्या दुचाकीवरून घुलेवाडीकडे जात होता. यावेळी नगरपालिकेच्या दिशेने रंगारगल्लीकडे सुसाट निघालेल्या वाळूतस्कराच्या ट्रॅक्टरची त्याच्या दुचाकीला जोराची धडक बसली.
त्यात तो खाली कोसळला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही सुरु झाला. मात्र ट्रॅक्टरचालक अपघातानंतर न थांबता दुप्पट गतीने तेथून पसार झाला.
जखमीला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले.
त्या दरम्यान मंगळवारी त्याचा मोठा भाऊ नीलेश याने शहर पोलीस ठाण्यात येवून याबाबत फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज शेख याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम