Aadhaar Alert : सध्याच्या काळात वेगाने वाढणारे डिजिटल व्यवहार आणि कागदपत्रांचा वापर जास्त असल्यामुळे फसवणुकीचा धोकाही वाढत चालला आहे.आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
कारण जर तुम्ही या फसवणुकीला बळी पडला तर तुमचे फक्त एका मिनिटात लाखो रुपये गायब होतील. जर तुम्हाला आधारद्वारे तुमची फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही एक काम काळजीपूर्वक करा, तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता.

एक कार्डधारक म्हणून, तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे की आधार कार्डधारकांनी त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डसोबत अपडेट ठेवावा असा UIDAI ने सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्ही फसवणूक टाळू शकता.
तुम्ही तुमच्या आधारसोबत कोणता मोबाईल नंबर अपडेट केला आहे, ते पहा
स्टेप 1
- तुम्ही तुमच्या आधार कार्डसोबत कोणता मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी लिंक आहे याबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुम्ही आता ते सहज तपासू शकता.
- तसेच यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या लिंकवर जावे लागणार आहे.
स्टेप 2
- त्यानंतर आता तुम्हाला येथे ‘Verify Mobile Number’ आणि ‘Verify Email Address’ असे दोन पर्याय दिसतील.
- तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर तपासण्यासाठी, तुम्हाला पहिला पर्याय निवडावा लागणार आहे.
- ईमेल आयडी तपासण्यासाठी दुसऱ्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
स्टेप 3
- यानंतर तुम्हाला ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.
- त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे.
- आता Send OTP पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- जर तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर OTP येत असेल तर याचा अर्थ तुमचा मोबाईल नंबर योग्य अपडेट आहे.