Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Aadhaar Card : नागरिकांनो लक्ष द्या ! आधारशी संबंधित ‘हा’ मेसेज फेक नाही… तुम्हालाही मिळाला असेल तर पटकन करा ‘हे’ काम

Thursday, December 1, 2022, 5:24 PM by Ahilyanagarlive24 Office

Aadhaar Card : आपल्या भारतात आज सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड हे होय. याचा वापर करून आपण आज केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या अनेक योजनांचे लाभ घेऊ शकतात तसेच बँकेत देखील आपले खाते उघडू शकतात.

मात्र सोशल मीडियावर आधार संबंधित अनेक फेक मेसेज व्हायरल होत असता त्यामुळे सध्या आधार संबंधित कोणता मेसेज रिअल आहे आणि कोणता फेक हे ओळख करणे अवघड झाले आहे. यातच आता UIDAI आधार कार्डधारकांना आधार संबंधीत एक मेसेज पाठवत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्हाला हा मेसेज आला असला तर तुम्ही तो हलक्यात घेऊ नका आणि मार्गदर्शक तत्त्वांचे नक्कीच पालन करा.

UIDAI हा मेसेज पाठवत आहे

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) अशा आधार कार्ड धारकांना, ज्यांचे कार्ड 10 वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी मेसेज पाठवत आहे. मेसेजमध्ये आधार कार्डच्या वैधतेच्या शेवटच्या तारखेचा संदर्भ देत असे म्हटले जात आहे की, ‘कृपया तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन तुमचे बायोमेट्रिक्स तपशील त्वरित अपडेट करा. हे कोणतेही शुल्क न घेता करता येते. हा मेसेज असा काहीसा पाठवला जात आहे.

‘Your Aadhaar is valid till (…) Please update the biometrics free of cost at the nearest Aadhaar center. UIDAI’

अपडेट करणे का आवश्यक आहे?

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या त्यांच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आधार अपडेट केल्यानंतर वापरकर्त्यांशी संबंधित अचूक माहिती सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मध्ये उपलब्ध होईल. आधार कार्डधारक ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याद्वारे त्यांचे आधार कार्ड नोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी अपडेट करू शकतात. तपशिल अपडेट करण्यासाठी नियमावली आणि तरतूदीमध्येही बदल करण्यात आले आहेत.

आजच तपशील अपडेट करा

कार्डधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर UIDAI द्वारे पाठवलेला हा मेसेज स्वीकारणे देखील खूप महत्वाचे आहे, कारण जर तुमचे आधार तपशील अपडेट केले नाहीत तर कार्डची वैधता संपुष्टात येऊ शकते. आजच्या तारखेप्रमाणे आधार हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे त्याची वैधता संपल्यामुळे तुम्हाला बँकांमध्ये खाती उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घरी बसून पत्ता कसा अपडेट करायचा

आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा आणि ‘प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस’ या पर्यायावर क्लिक करा.

आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपी वापरून लॉगिन करा.

‘पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.

12 अंकी आधार क्रमांक टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.

OTP प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.

‘अपडेट न्यू अॅड्रेस प्रूफ’ हा पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता प्रविष्ट करा.

यानंतर, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट करावयाची कागदपत्रे निवडा.

पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. आधार अपडेट विनंती स्वीकारली जाईल आणि 14-अंकी अपडेट विनंती क्रमांक तयार केला जाईल.

हे पण वाचा :- Youtube Alert: तुम्ही YouTuber असाल तर सावधान ! चुकूनही ‘या’ चुका करू नका नाहीतर चॅनल होणार बंद

Categories ताज्या बातम्या, टेक्नोलाॅजी, भारत Tags Aadhaar card, Aadhaar Card Alert, aadhaar card appointment online, Aadhaar Card Big Update, aadhaar card download, Aadhaar Card latest news, Aadhaar card latest rules, Aadhaar Card latest update, Aadhaar Card Link to Bank Account, Aadhaar Card Mobile Number Linking, Aadhaar Card new rules, aadhaar card news, Aadhaar Card Update, Aadhaar Card Update details
Maruti Alto : फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जा मारुतीची कार, मायलेजही आहे जबरदस्त
महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी : गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसेसवर स्थगिती
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress