Aadhaar Card : आधार कार्ड आता प्रत्येक कामासाठी महत्त्वाचे झाले आहे. अनेक आर्थिक कामे आधार कार्डशिवाय अडकत आहेत. इतकेच नाही तर सरकारी कामे तसेच शाळा आणि महाविद्यालयांसारख्या ठिकाणीही आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
तुम्ही आता बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे न राहता तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. ते देखील अगदी घरबसल्या. होय त्यासाठी तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुम्ही आता आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
इतकेच नाही तर, बँक खाते आधार सोबत लिंक केल्यामुळे, आता तुम्ही फक्त एक क्लिक करताच आधार क्रमांकाद्वारे आपली बँक शिल्लक सहज पाहू शकता.
अशी तपासा बँक खात्यातील शिल्लक
जर तुम्हालाही तुमच्या आधार कार्डद्वारे बँक बॅलन्स चेक करायचा असल्यास तुमचे इंटरनेट हळू चालत असेल, तर तुम्हाला तुमच्या आधारद्वारे तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासता येईल. परंतु त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99*99*1# वर कॉल करावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे.
आता या क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. यानंतर UIDAI तुम्हाला एक मेसेज पाठवू शकते ज्यामध्ये तुम्ही सहजपणे बँक बॅलन्स घरबसल्या पाहू शकता. इतकेच नाही तर तुम्ही आता आधारच्या माध्यमातून सरकारी अनुदानासाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज करणे यांसारखी महत्त्वाची कामे सहज करू शकता.
असे तपासा तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही
- सर्वात अगोदर तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागून ‘आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा’ वर क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर आता तुम्ही बँक मॅपर पेजवर येऊ शकता. तुम्ही आता http://resident.uidai.gov.in/bank-mapper या थेट लिंकलाही भेट देऊ शकता.
- नंतर UID/VID, सुरक्षा कोड टाकून तुम्हाला ‘OTP पाठवा’ वर क्लिक करावे लागणार आहे.
- आता तुम्हाला तुमच्या UIDAI कडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो तुम्हाला एंटर करून लॉगिन वर करावे लागणार आहे.
- सगळ्यात शेवटी बँक खात्याशी आधार लिंक करण्याबाबतची सर्व माहिती तुमच्या समोर येईल.