Aadhar Card : आधार कार्ड आता सगळीकडे अनिवार्य झाले आहे. मात्र ज्या वेळी केंद्र सरकारकडून (Central Goverment) आधार कार्ड बनवली गेली तेव्हा अनेकांच्या आधार कार्ड मध्ये चुका (Missed) झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांची कामे रखडली आहे.
पीएम किसानसाठी ई-केवायसी असो किंवा ई-श्रमसाठी नोंदणी असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा (Government scheme) लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आधार कार्ड विचारले जाते.
आधारमध्ये नाव, मोबाईल नंबर किंवा पत्ता चुकीच्या स्पेलिंगमुळे बहुतेक लोकांना लाभ नाकारला जात आहे. पीएम किसानचा हप्ता थांबला तर ई-लेबरचे पैसे अडकणार आहेत.
अशा परिस्थितीत आधार अपडेट करण्यासाठी लोक आधार सेवा केंद्रांकडे (Aadhaar Service Center) धाव घेत आहेत. छोट्या शहरातील या केंद्रांवर नाव, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांकडून खंडणी उकळल्याच्या तक्रारी सर्रास घडतात.
अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की आधारमध्ये कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी निर्धारित शुल्क किती आहे? आधार जारी करणारी प्राधिकरण UDAI ने ट्विट केले आहे की आधार नोंदणी विनामूल्य आहे.
आधारमधील कोणत्याही डेमोग्राफिक अपडेटसाठी ₹50 आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी ₹100. तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यास, कृपया अधिक तपशीलांसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1947 किंवा [email protected] वर ईमेल करा.