आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या दिवशी होणार प्रदर्शित

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे.

याबाबत आमित खान प्रोडक्शनने सांगितले की, ‘आम्ही सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत करतो. महामारीमुळे आमचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही.

आता २०२२ ला ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी ‘लाल सिंह चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’चा रिमेक ‘लाल सिंह चड्ढा’ असणार आहे.

या चित्रपटातून पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूरची जोडी पाहता येणार आहे. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe