अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पाच ठिकाणी गावठी अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने बुधवार 8 सप्टेंबर रोजी छापा टाकून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने.
मिटके यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्यासह देवळाली प्रवरा येथे परिसरातील ५ गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा केला आहे. या कारवाईत १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जणांवर गुम्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हेडकोन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस नाईक झ पंकज गोसावी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, राहुल नरवडे, सुनील दिघे, गौतम लगड, पूजा पवार, अनिता गीते आदींनी ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम