अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- समाजात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा अशा घटना घडतात कि ते वाचून आपलेच डोके बंद पडते. एखाद्या व्यक्तीस कधी कधी अशी व्यसने जडतात की त्या व्यवसानापायी ते सर्वस्व गमावून बसतात.
अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रोड्युसरने ऑनलाइन अॅडल्ट शोचाण्डात एक कोटी रुपये उडवले आहेत. मार्क जोहान असे या डॉक्युमेंट्री कंपनीच्या प्रोड्युसरचे नाव आहे. ऑनलाइन अॅडल्ट शो पाहण्यासाठी मार्क जोहानने कंपनीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तब्बल एक कोटी रुपये खर्च केले होते.

काय आहे प्रकरण :- कंपनीद्वारे मार्क जोहानवर कंपनीच्या पैशांच्या गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला होता. ब्रिटनच्या metro.co.uk या वेबासाईटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तानुसार ५५ वर्षांचे प्रोड्युसर मार्क जोहाने अॅडल्ट शो पाहण्याच्या नादात कंपनीची मोठी रक्कम उधळली आहे.
जेव्हा या खर्चाबद्दल कंपनीच्या लक्षात आले आणि त्यांनी मार्क जोहानकडे यासंदर्भात विचारणा केली तेव्हा मार्क याबाबत काहीच हिशेब देऊ शकले नाहीत.
यानंतर कंपनीने मार्क जोहानविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण न्यायालयात पोचले. मार्कने क्रॉयडन मॅजिस्ट्रेट कोर्टात ऑक्टोबर २०१९ आणि नोव्हेंबर २०२०मध्ये झालेल्या युक्तिवादात आपला गुन्हा मान्य केला आहे. अलीकडेच लंडनच्या क्राउन कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली होती.
ऑडिटरने केला खुलासा – मार्क जोहान त्या काळात आपल्या कंपनीच्या लॉजिस्टिक्सचे काम पाहत होते. २०१९मध्ये त्यांना कंपनीने एक क्रेडिट कार्ड दिले होते.
मार्कने आपल्या पदाचा गैरवापर आपल्या पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या व्यसनासाठी केला. म्हणजेच कंपनीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून लाईव्ह ऑनलाइन अॅडल्ट शो, पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाटी त्यांनी मोठी रक्कम खर्च केली. कंपनीच्या ऑडिटर्सला संशय आल्यावर कंपनीने मार्ककडे १ कोटी रुपयांचा हिशोब मागितला.
मात्र मार्क जोहान हा हिशोब देऊ शकले नाहीत तेव्हा कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली होती. २०२० मध्ये मार्कने कंपनीतून राजीनामा दिला. मात्र त्यांच्या विरोधातील प्रकरण सुरूच राहिले.
त्यानंतर मार्क यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. कोर्टाने मार्कचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र एवढा काळ ते आधीच तुरुगांत राहिले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम