अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथून ३ नोव्हेंबर २०२१ रोजी ढवळगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात ४ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून तीचा तपास लागत नसल्याने या गुन्ह्यातील पीडित मुलीबाबत कोणास काही महिती असल्यास
बेलवंडी पोलिस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले अाहे. या मुलीची माहिती मिळाल्यास
बेलवंडी पोलिस स्टेशन फोन नं ०२४८७- २५०२३३ पोलिस निरीक्षक एन. व्ही. दुधाळ ९४२३५८३ ९ ५५, पोलिस उपनिरीक्षक आर. यू. चाटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम