राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अल्पवयीन मुलीला तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहते.

ती अल्पवयीन मुलगी तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. मुलीच्या आईने राहुरी पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे.

तिला संशयीत आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याने पळवून नेले आहे. असा तिच्या नातेवाईकांना संशय आहे.

दरम्यान दाखल फिर्यादीवरून आरोपी अनिकेत गोरख चव्हाण रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe