Sushama Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सुषमा अंधारे सोडत नाहीत. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही सिल्लोडमध्ये सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या द्राक्षणासाठी फुटीर आमदारांना घेऊन गेले होते. त्यावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जाऊन सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, कनाथ शिंदे आमच्या अब्दुल सत्तार भाईला गुवाहाटीला घेऊन गेले.
तुम्ही कामाख्या मंदिरात गेला तेव्हा सत्तार भाई कुठे होते? सत्तार यांना इस्लाम कळतो का? अब्दुल भाई मी तुमचे इमान जागे करायला आले आहे.
सुषमा अंधारे यावेळी सत्तारांवर चांगल्याच बरसताना दिसल्या, अब्दुल भाई मी तुमची बहीण आहे आणि मी तुम्हाला रस्ता दाखवायला आले आहे. अब्दुल सत्तार यांनी अनेक पक्षाचे रुमाल बदलले. तुम्ही कपड्या सारखे पक्ष बदलले.
अब्दुल सत्तार यांना एका कट छक्का ही मटक्याचे भाषा कळते. त्यांना टू वनजा टू कळत नाही. कधी कधी संशय येतो की, अब्दुल भाई तुम्ही घरवलीचे तरी आहात का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
अब्दुल सत्तार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचाही संचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, अब्दुल भाई तुम्ही सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बोलला.
त्यावर तुमची त्यावरून लायकी ठरते. सुप्रिया सुळे यांना तुमच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही. कधी कधी वाटतं देवेंद्र फडणवीस हे अब्दुल भाईंना ठरवून बोलायला सांगत असतील.