AC on Rent : नवीन एसी घ्यायचाय? पण बजेट नाही, तर मग अवघ्या 5000 रुपयात घरी आणा हा ब्रँडेड एसी

Ahmednagarlive24 office
Published:

AC on Rent : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उकाड्यापासून अनेकजण ब्रँडेड एसी खरेदी करत आहे. परंतु मागणी जास्त असल्याने या सर्व एसीच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हालाही कमी किमतीत ब्रँडेड एसी घरी आणायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदची बातमी आहे.

कारण तुम्ही आता अवघ्या 5000 रुपयात ब्रँडेड एसी घरी आणू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हे एसी खरेदी करावे लागणार नाहीत. तुम्ही ते आता भाड्याने एसी करता येतील. अशी संधी तुम्हाला कुठे मिळेल ते जाणून घ्या.

अनेकांना असे वाटते की त्यांनी भाड्याने एसी घ्यावा. परंतु आता तुम्ही कमी खर्चात एका शानदार एसीचा आनंद घेऊ शकता. अनेकांना भाड्याने एसी कसा खरेदी करावा हे माहिती नसते.

सध्या अशा अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने एसी घेता येईल. अशीच एक http://rentpelelo.com नावाची वेबसाइट आहे, जी भाड्याने एसी देत आहे. या वेबसाइटवर तुम्हाला एसीचे अनेक पर्याय मिळत आहेत.

या वेबसाइटवरून तुम्हाला मासिक भाड्याने एसी खरेदी करता येईल. ही वेबसाइट 1.5 टन एसीसाठी प्रत्येक महिन्याला 777 रुपये आकारत आहे. तुम्हाला 6 महिने एसी वापरण्यासाठी तुम्हाला अवघे 5000 रुपये मोजावे लागणार आहे.

कंपनीकडून एसी घेताना तुम्हाला काही सिक्युरिटी डिपॉझिट करावी लागणार आहे. तुम्ही हा विंडो एसी 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतला तर एकूण 6500 रुपये सुरक्षा रक्कम जमा करावी लागणार आहे. याच वेबसाइटवर तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील. याची एक खासियत लक्षात ठेवा की, भाड्याने हा एसी घेण्यापूर्वी सर्व तपासून घ्या.

इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानातून भाड्याने एसी घेता येईल. हा एसी जुने असला तरी त्यामुळे वीज बिलही जास्त येते. परंतु हा एसी भाड्याने घेण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासून घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe