Ahmednagar : ‘त्या’ सराईत आरोपीस शिर्डीत अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

Published on -

Ahmednagar :  अहमदनगर गुन्हे शाखेने (Ahmednagar Crime Branch) मोठी कारवाई करत पंजाब (Punjab) राज्यातील जालंधर (Jalandhar) शहरात गोळीबाळ करू पसार झालेल्या आरोपीला शिर्डी (Shirdi) मध्ये अटक केली आहे. गुन्हे शाखाने या कारवाई एका 27 वर्षीय तरूणाला अटक केली आहे. 

पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुनीत सोनी हा सराईत गुन्हेगार असून त्याने जालंधर शहरात गुन्हा करून पसार झाला होता. याआधी देखील त्याच्याविरुद्ध पंजाबमध्ये (Punjab)गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत. जालंधर पोलीस या आरोपीचा शोध घेत होती. तपास दरम्यान हा आरोपी शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती जालंधर पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना दिली होती. 

या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडगे, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, भीमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व शिर्डीतील १३३ हॉटेलची तपासणी करून वरील आरोपीस अटक केली आहे. 

आरोपीस त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने जसप्रीतसिंग भुलाव (रा. जालंधर, पंजाब) असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन कसून चौकशी करता, त्याने त्याचे खरे नाव पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. शहीद बाबूलालसिंगनगर, जालंघर) असे सांगितले. त्यास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. पंजाब पोलिसांशी संपर्क करून आरोपीस ताब्यात घेतल्याबाबत कळविले आहे.  

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe