Ahmednagar Rape News : भोळसरपणाचा फायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रम संजय वाणे (वय ३७, रा. प्रशांत सोसावी, कल्याण रोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. विक्रम वाणे हा त्याच्या कल्याण रोडवरील राहत्या घरी आला. असता कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली.
कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीवर १३ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. विक्रम संजव वाणे याने ‘पीडित महिलेला स्वभावाचा फायदा घेऊन भाड्याने घर दाखवण्याच्या बहाण्याने घरी नेले होते. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बळजबरी अत्याचार केला होता.

गुन्ह्याचा तपास करीत असताना कोतवाली पोलिसांना त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आघारे कोतवाली पोलिसांच्या पथकाने आरोपी विक्रम वाणेला अटक केली. आरोपीने गुन्हयाची कबुली दिली आहे.