Maharashtra news : सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी नुकतीच राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी करून अहवाल तयार केला आहे.
त्या आधीच त्यांनी राजीनामा देऊ केला आहे. अशे असेल तरी त्यांच्या विरूद्धची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. डायटकडे प्रतिनियुक्तीवर असताना ३४ महिने गैरहजर राहिल्याने त्यांनी या काळात उचलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली.

रवाई होण्याअगोदर राजीनामा नोटीस दिल्याने कारवाई थांबणार नाही, त्यांना दिलेला सर्व पगार शासन वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसले यांना पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यानुसार ऑगस्टमध्ये पी. एचडी करण्यासाठी डिसले गुरुजी अमेरिकेला जाणार होते. त्यासाठीच्या रजेवरून हा वाद निर्माण झाला होता.