AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले.
भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गर्जे याना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.प्रसारमाध्यामांच्या काही प्रतिनिधींनी बोलावून त्यांच्याशी बोलत असताना गर्जे यांनी जवळची बाटली काढून तोंडाला लावली.
त्यावेळी उपस्थितांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडीस बाटली काढून घेण्यात आली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. ही स्टंटबाजी असावी की संतप्त प्रतिक्रिया, या विषयी आता तालुक्यात चर्चा सुरू आहे.













