अभिनेता धनुषचा ‘कर्णन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांपासून सिनेमागृह बंद ठेवण्यात आली होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे.

यामुळे आता पूर्ण क्षमतेने सिनेमागृह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता अनेक मोठे सिनेमे रिलीजच्या तयारीत आहे, यातच प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा ‘कर्णन’ (Karnan) चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता याच चित्रपटाविषयी एक मोठी बातमी पुढे आली आहे.

नुकताच धनुषने या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली असून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर धनुषने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे.

धनुषने ट्विट करत चित्रपटातील फर्स्ट लूक आणि चित्रपटाची तारीख जाहिर केली आहे. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुषचा जबरदस्त लूक दिसत आहे. धनुषचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची चित्रपट बघण्याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe