अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’ 4 मार्च 2022 रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
सिनेमाची कथा ही सत्य घटनेवर आधारित असून बिग बी मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. झुंड सिनेमाचे पोस्टर अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर शेअर केले आहे.
नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. COVID-19 मुळे, चित्रपटाला त्याची रिलीज डेट अनेक वेळा मागे घ्यावी लागली.
पण, शेवटी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. अमिताभ बच्चन यांचा हा सिनेमा ‘झुंड’ हे स्पोर्ट्स ड्रामा,
एनजीओ स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच बच्चन एका प्राध्यापकाच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम